👁 8 Views

माती काम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यु

 

संक्रांतीसाठीची मातीची भांडी तयार करताना विजेचा धक्का लागल्याने प्रदीप जोतिराम कुंभार


 (वय 22, रा. कुंभार गल्ली, खुपीरे) याचा मृत्यू झाला.


इलेक्ट्रिक चाकावर तो कुंभार काम करत असताना ही घटना घडली. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रदीपवर 


घरची जबाबदारी होती. त्याच्या मृत्यूने कुंभार कुटुंबाचा आधारच हरपला आहे.


प्रदीपच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच्या दोन्ही बहिणी विवाहित असून, तो आईसोबत खुपीरेत राहत होता.

 मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत तो एमआयडीसीमध्ये काम करून घर चालवत होता.


 घरचा पारंपरिक कुंभार व्यवसाय असल्याने तो आईला या कामी मदत करायचा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *