👁 5 Views

अरेरे! वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक

 

कोल्हापूरच्या कळंब्यातील तरुणाने वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक झाली आहे. पेट घेतलेल्या दुचाकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कळंबा परिसरात मध्यरात्री तीन च्या सुमारास लागलेल्या आगीत दोन वाहने जळून खाक झाली झाली आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही.


कळंब्यातील तरुणाने दिवाळीत हौसेपोटी चक्क 21 लाखाची दुचाकी खरेदी केली होती. 21 लाखाची दुचाकी खरेदी केल्यानंतर हौसेपोटी वाजत गाजत मिरवणूक देखील काढली होती. 


वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक झाली आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास लागेलल्या आगीत 21 लाखाची दुचाकी मालकाच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली. जवळपास 40 लाखांचे नुकसान झाले आहे. 


अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दुचाकी गाड्यांची मोठी हौस असल्याने कोल्हापुरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने दीपावलीच्या दुचाकी खरेदी केली. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने त्याच्या नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली.


 त्यानंतर युवकाने खरेदी केलेल्या दुचाकीचीचं गावभर चर्चा झाली. वकाने खरेदी केलेली ही आगळीवेगळी दमदार गाडी खरेदी करण्याची हौस त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. मध्यरात्री लागलेल्या आगीत दुचाकी जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *