👁 10 Views

मंगळवेढा: शासकीय मुरुमाची चोरी

 

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी परिसरातील उजनी कालव्यावरील बेकायदा 64 हजार 875 रुपये किमतीचा मुरूम चोरी केल्याप्रकरणी


जेसीबी चालक, टिपर चालक व मालक तसेच भाग्यवान ज्ञानेश्‍वर यादव (रा.तावशी), टिपर मालक अजय सावंत (रा.कचरेवाडी) आदीजणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.


याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी भिमा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी दत्तात्रय बुरुंगले हे दि.11 रोजी कार्यालयात असताना


त्यांना कचरेवाडी येथील उजनी कॅनॉलजवळील शासकिय मुरुमाची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच.

फिर्यादी व त्यांचे सहकारी कालवा निरिक्षक व्ही.एम.भोसले, मोजणीदार, डी.एम.पडवळे,चौकीदार व्ही.आय.कोंडुभैरी आदी सदर उजनी कालवा कि.मी.104 येथील घटनास्थळी गेले असता


सदर ठिकाणी एम.एच 13 डी.टी. 7231 या जेसीबीने कालव्यातील उत्खनन केलेला मुरुम टिपर क्रमांक एम एच 13, डी.क्यू. 2833 हा पूर्ण भरून

टिपर क्रमांक एम.एच 13. डी.क्यू. 2023 मध्ये भरण्याचे काम चालू होते.

फिर्यादीने याचे छायाचित्र मोबाईलमध्ये काढले व या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी हलकुडे यांना दिली. व ते ही शासकिय वाहनाने घटनास्थळी हजर होवून उपसलेल्या मुरुमाचा पंचनामा केला असता


64 हजार 875 रुपये किमतीच्या मुरुमाची चोरी झाली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सदर घटनास्थळावरील एक जेसीबी व एक टिपर अधिकार्‍यांना पाहताच पळून गेले तर एम एच 13 डी.क्यू.2833 हा टिपर पोलिस ठाण्यात आणून हजर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *