👁 8 Views

राष्ट्रीय लोकअदालतीत १६१ प्रकरणे निकाली लोकअदालतीत २ कोटी ६० लाख ९६ रुपयांची तडजोड.


पंढरपूर (दि.१२)- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये १६१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.  या प्रकरणांमध्ये २ कोटी ६० लाख ९६ हजार ७५८ तडजोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष  एम. बी. लंबे यांनी दिली.


      राष्ट्रीय लोकअदालतीसाठी  एकुण ५ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती.  यामध्ये १६१ प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.


या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ एम. आर. जाधव, दिवाणी न्यायाधीश एस. ए. साळुंखे, 


 दिवाणी न्यायाधीश  श्रीमती आर. जी. कुंभार, सह दिवाणी न्यायाधीश एस. एच. इनामदार, यांनी काम पाहिले.

         तत्पूर्वी लोकअदातीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एम.बी लंबे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  लोक अदालतीबाबतची  महत्वाची माहिती सांगण्यात आली.


 यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष भगवान मुळे,. विधी स्वयंसेवक  सुनिल यारगट्टीकर  हे उपस्थित होते.


       सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *