👁 5 Views

सोसायटीच्या दरवाज्यात कोब्राने काढला फणा

 

ठाण्यात एक विषारी कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात सोसायटीच्या इमारतीत शिरून दरवाजात फणा काढून बसल्याने रहिवाशांची वाट अडवल्याने एकच घबराट पसरली होती. तर तेलाचा घाणा असलेल्या कारखान्यात ७ फुटाचा साप शिरल्याने कामगारासह मालकाने कारखान्याबाहेर पळ काढला  होता.


बदलत्या हवामानामुळे विषारी, बिन विषारी साप भक्ष्यासह उब मिळावी म्हणून मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.


 पुन्हा एक विषारी भक्ष्याच्या शोधात सोसायटीच्या इमारतीत शिरून दरवाजात फणा काढून बसल्याने रहिवाशांची वाट अडवल्याने एकच घबराट पसरली होती. तर तेलाचा घाणा असलेल्या कारखान्यात ७ फुटांचा साप शिरल्याने कामगारासह मालकाने कारखान्याबाहेर पळ काढला होता.


 विषारी बिन विषारी साप थंडीच्या दिवसात उब मिळावी, तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. आजही मानवी वस्तीत साप शिरल्याच्या पुन्हा तीन घटना आहे.


 पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील नीलकंठ सोसायटीत घडली असून या सोसायटीच्या एका इमारतीच्या मुख्य प्रवेश दारातून कोब्रा नाग भक्ष्याच्या शोधात शिरला होता. मात्र त्याला भक्ष्य मिळाले नसल्याने तो तळ मजल्यावरील एका दारात फणा काढून बसला होता. 

या कोब्रा नागाकडे एका महिलेचे लक्ष जाताच, तिने रहिवाशांना नाग सोसायटीत शिरल्याची माहिती दिली. रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती.


 त्यानंतर विद्या कामात यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून सोसायटीत नाग असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी येऊन त्यांनी फणा काढून बसलेल्या कोब्रा नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. कोब्रा नाग पडकल्याच पाहून रहिवाशांनी सुटेकचा निश्वास घेतला. हा कोब्रा नाग साडे फूट लांबीचा असून अंत्यत विषारी असल्याचे सर्पमित्राने सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *