👁 9 Views

दारूच्या पैशावरून वाद खून करुन फेकले विहिरीत

 

दारूच्या पैशाच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा दोघांनी खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरदार पटेल चौकात उघडकीस आली.

शनिवारी याची माहिती पोलिसांना मिळताच चोवीस तासांच्या आत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

रामसिंग ठाकूर (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे. राजू बुराडे व मुकेश अंभोरे असे, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रामसिंग खासगी काम तर राजू व मुकेशही गवंडी काम करतात.

रामसिंग परिसरातील एका पडक्या झोपडीत राहतात. राजू व मुकेशला दारूचे व्यसन असून, शुक्रवारी सायंकाळी त्यांचा रामसिंग यांच्यासोबत वाद झाला. रात्री दोघेही दारू पिऊन रामसिंग यांच्या घरी गेले.

 त्यांनी रामसिंग यांच्यासोबत वाद घातला. रामसिंग यांच्या डोक्यावर काठीने वार केला व दोघेही पसार झाले. यामध्ये रामसिंगच्या रामसिंग डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

 रविवारी मृतदेह पाहणाऱ्या व्यक्तीने इमामवाडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकमल वाघमारे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. 

यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासास सुरुवात केली. चोवीस तासाच्या आत राजू आणि मुकेश यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *