राज्यातील विविध जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे.
त्यासाठी शेतकरी साखर कारखान्यांवर ऊस नेत आहेत. या ऊस वाहतुकीमुळे अनेकदा वाहतुक काेंडी हाेत असल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळते तर कधी अपघात देखील घडले आहेत.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी – दौंड- पाटस अष्टविनायक मार्गावर उसाच्या ट्रॅक्टर – ट्रॉलीला धडकून हा अपघात झाला.
यामध्ये दुचाकीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हे तिन्ही युवक नगर जिल्ह्यातील काष्टी येथील रहिवासी होते.
उसाच्या ट्रॅक्टर – ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे
दौंड – पाटस अष्टविनायक मार्गावर मांढरे मळ्याच्या अलीकाडे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात
ऋषीकेश महादेव मोरे (वय २६), स्वप्निल सतिश मनुचार्य (वय २४) व गणेश बापु शिंदे (वय २६, तिघे रा. काष्टी बाजारतळ परिसर, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) हे तिघे मृत्यूमुखी पडले.
ऋषीकेश मोरे व त्याचे दोन मित्र एका दुचाकीवरून जेवणासाठी रात्री दौंड – पाटस रस्त्यावर आले होते.





