सख्ख्या पुतण्यानेच काकाची तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये उघडकीस आला आहे. चेकचा दुरुपयोग करुन त्याद्वारे पैसे आपल्या खात्यावर ट्रान्स्फर कले.
प्रकार मार्च 2010 ते जानेवारी 2013 या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय भाऊसाहेब वाघेरे (रा. पिंपरीगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 35 वर्षाच्या महिलेने पिंपरी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उदय वाघेरे यांनी आपले चुलते सुदाम उर्फ सुधीर वाघेरे यांच्या पवना बँक खात्याच्या चेकचा दुरुपयोग करुन 34 लाख 8 हजार रुपये आपल्या खात्यात जमा करुन घेतले.
तसेच त्यांनी सुधीर वाघेरे यांच्या खात्यावरील 2 कोटी 99 लाख 70 हजार रुपये आरटीजीएसने आपल्या खात्यावर
जमा करुन घेतले
आणि तात्काळ इतरांच्या खात्यावर ट्रान्स्फर केले.
हा प्रकार तब्बल 9 वर्षांनी लक्षात आल्याने सुधीर वाघेरे यांच्या मुलीने आणि मुलगा चेतन सुधीर वाघेरे यांनी
पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनगळ करत आहेत.





