👁 7 Views

हॉस्पिटल परिसरात बिबट्या शिरला

 

नाशिकमध्ये मध्यरात्री बिबट्याचा थरार पुन्हा एकदा नाशिककरांना अनुभवायला मिळाला आहे. गाडीचा खाली बसलेला बिबट्या दिसल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली. नाशिकच्या सह्याद्री रुग्णालय परिसरात हा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास परिसरातील एका कार खाली बिबट्याने बैठक मारलेली होती. बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. लाठ्याकाठ्या घेऊन नागरिक जमले होते त्यातच पळालेल्या बिबट्याचे मागे नागरिक धावत असल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांचे पथके दाखल झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी तब्बल दोन तास प्रयत्न सुरू होते. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला बिबट्या चकवा देत धूम ठोकत होता.


एका बंगल्याबाहेर जाळी धरून पथक उभे असताना बिबट्याने त्यांना चकवा दिला. बाहेर येऊन पुन्हा दुसऱ्या बंगल्याकडे बिबट्याने धाव घेतली होती.


बिबट्याला पाहण्यासाठी जमलेले नागरिकही बिबट्याच्या मागे पळत असल्याने बिबट्याला रेस्क्यू करतांना मोठी अडचण निर्माण झाल्याने पोलीसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.


हॉस्पिटल परिसरात हा बिबट्या दिसल्याने हॉस्पिटलमधील रुग्णांचे नातेवाईक, परिसरातील नागरिक यांची बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


मध्यरात्री बिबट्याचा हा थरार रंगल्याने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, मात्र बिबट्याला जेरबंद केल्यानं नाशिककरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.


शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढू लागल्याने नाशिककरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वारंवार बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी केली जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *