👁 8 Views

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला , प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव

 

लग्नानंतर सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात.


अनेकदा हा छळ हुंड्यासाठी केला जातो. तर, बऱ्याचदा याला इतरही कारणं असतात. मात्र, सासरच्या या छळाला कंटाळून अनेक महिला अगदी टोकाचं पाऊल उचलताना पाहायाला मिळतात. सध्या अशीच एक खळबळजनक घटना बुलडाण्यातून समोर आली आहे.


घटनेमध्ये अवघ्या 19 वर्षाच्या विवाहित महिलेनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. या महिलेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


पिंपळखुंटा येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या सासरकडच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार करून बोरखेडी पोलिसांत सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उर्मिला सागर उमाळे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उर्मिला हिने घरच्यांच्या विरोधात जात पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. मात्र, या प्रेमविवाहानेच तिचा जीव घेतला.


चाकणमधूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची केवळ यासाठी हत्या केली, कारण ती जुन्या प्रेमसंबंधाकडे दुर्लक्ष करत आहे, असं त्याला वाटलं. 

प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्यासोबत बोलत नसल्याच्या रागातून प्रियकराने 28 वर्षीय विवाहित महिलेचा खून केल्याचा प्रकार चाकणमध्ये उघडकीस आला. राम सुर्यवंशी असं आरोपीचं नाव असून महिलेच्या खून प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी राम याला अटक केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *