👁 5 Views

शाळेत न जाण्यासाठी केला चिमुकल्या चुलत बहिणीचा खून

 

शहरात एका पाचवर्षीय चिमुकलीवर ब्लेडने वार करून खून झाल्याची घटना सोमवारी (ता.२८) उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या १४ वर्षीय बहिणीला ताब्यात घेतले आहे

शाळेत जाण्यासाठी घरचे सतत तगादा लावत असल्याने आपल्या चिमुरड्या चुलत बहिणीचा तिने ब्लेडने वार करून खून केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली.


शहरातील मंठा रस्त्यावरील चौधरीनगर भागात ईश्वरी रमेश भोसले (वय पाच) हिचा तिच्याच १४ वर्षीय चुलत बहिणीने सोमवारी बाथरूममध्ये ब्लेडने वार करून खून केला. या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 


शिक्षणासाठी जालना येथे काकाकडे राहत असलेल्या ईश्वरीचा खून हा तिच्या चुलत बहिणीने रागाच्या भरत केल्याचे पुढे आहे. संशयित अल्पवयीन मुलीने मागील आठवड्यात शाळेत मोबाइल फोन चोरला होता. ही मोबाइल चोरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पकडली होती.


तिने मोबाइल चोरी केल्याची चर्चा संपूर्ण शाळेत सुरू झाली होती. त्यामुळे संशयित अल्पवयीन मुलगी ही मागील आठवड्यापासून शाळेत जात नव्हती. मात्र, तिने शाळेत जावे, यासाठी कुटुंबीय सतत तगादा लावत होते. मोबाइल चोरी पडल्याने संशयित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जाण्यास तयार नव्हती. 


याच रागाच्या भरात तिने सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या अंघोळीसाठी गेलेल्या ईश्वरीचा बाथरूममध्ये खून केला. 


अल्पवयीन मुलीने ईश्वरीच्या हातावर, गळ्यावर, चेहऱ्यावर वार केल्याची माहिती तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी वडते यांनी दिली. दरम्यान, संशयित अल्पवयीन मुलीला बालसुधारगृह येथे ठेवण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *