👁 8 Views

हजारो लोकांसमोर कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड

 

दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत घडली आहे. 


या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.


व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दक्षिण कोरियातील एक महिला यूट्यूबर मोबाईवर लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसतं आहे.


 त्याचवेळी दोन तरुण तिच्याजवळ येत तिच्याशी जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे युट्यूबर महिला विरोध करत असताना आरोपी तिचा चेहरा बळजबरीने स्वत:कडे ओढत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे.


महिलेला हे दोन तरुण तिच्याशी काही गैरकृत्य करत असल्याचं लक्षात येताच तीने पळ काढण्याचा प्रयत्न केला.


 मात्र, ती महिला तिचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत पुढे निघून गेल्यानंतरही छेडछाड करणारे दोन्ही तरुण तिचा पाठलाग करत, तिची इच्छा नसताना तिला बळजबरीने तिला लिफ्ट द्यायचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *