👁 5 Views

पतीशी मैत्री केल्याने बारमध्ये वेटर म्हणुन काम करणाऱ्या महिलेला मारहाण

 

पतीशी मैत्री केल्याने महिला आणि तिच्या सासरकडील मंडळीनी बारमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचे तिच्या घरात शिरून मारहाण करत तिचे कात्रीने कपडे फाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


तसेच तिचे अर्धनग्न छायाचित्रेही काढण्यात आली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहत असून तिची बारमध्ये एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यामुळे अनेकदा तो व्यक्ती तिच्या घरी येत असे त्यातून दोघांचे प्रेमसंबध झाले होते. 


याची माहिती व्यक्तीच्या पत्नीला आणि त्याच्या कुटुंबियांना मिळाली होती. त्यामुळे पिडीत महिला व्यक्तीची पत्नी आणि त्याचे कुटुंबिय संपर्क साधून प्रेमसंबंधास विरोध करत होते. शनिवारी तो व्यक्ती पिडीत महिलेच्या घरी आला होता.


सकाळी तो दुध आणण्यासाठी बाहेर गेला असता व्यक्तीची पत्नी, त्याची आई, सासू आणि एक व्यक्ती तिच्या घरी आले. त्यांनी घरात शिरून महिलेला मारहाण केली. 


त्यानंतर व्यक्तीचा पत्नीने आणि आईने हात-पाय पकडले. तर सासूने घरातील कात्रीने तिचे कपडे फाडले. तसेच त्या व्यक्तीने तिचे मोबाईलमध्ये अर्धनग्न छायाचित्र काढले.


 या घटनेनंतर महिलेचे काका तिच्या घरी आले. त्यांनी तिची सोडवणूक केली. घटनेनंतर पिडीत महिला श्रीनगर पोलीस ठाण्यात आली. तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *