👁 6 Views

चाकूने वार करत चोरट्यांची चोरी

 

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी पहाटे दोघा चोरट्यांनी तबेल्यात शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला.


तबेल्यातील कामगारांनी त्यांना विरोध केला असता चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. कामगाराने आरडाओरडा करताच तबेला मालक व नागरिक गोळा झाले. त्यांनी चोरट्याला पकडत त्याला चांगला चोप दिला. 


कोळसेवाडी पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोशन शर्मा (वय 19) याला अटक केली. त्यानंतर बबल्या उर्फ कृष्णा यालाही अटक करण्यात आली. चोरट्याच्या हल्ल्यात जयहिंद यादव (वय 22) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरीच्या घटना घडत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात दुर्गा माता मंदिर रोड परिसरात जॉन तबेला आहे. रविवारी पहाटे 4 च्या दरम्यान तबेल्यातील कामगार हे काम करीत होते. 


जयहिंद व त्याचा मित्र मंटू यादव हे काम करीत असतानाच आनंदवाडी परिसरात राहणारा रोशन व त्याचा जोडीदार बबल्या उर्फ कृष्णा हे दोघे तबेल्याचा गेट खुला असल्याने आत शिरले. तबेल्यातील एका खोलीतील संगणकाचा मॉनिटर व मोबाईल फोन चोरुन घेऊन त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. 

तबेल्याच्या खोलीत कोणीतरी शिरले असल्याचे जयहिंदने पाहील्याने त्याने लक्ष दिले असता, रोशन हा तेथून पळ काढत होता. यावेळी जयहिंद व मंटू या दोघांनी रोशन व कृष्णा यांना अडविण्याचा प्रयत्न केला.


यावेळी रोशनने त्याच्या खिशातील चाकू काढला आणि जयहिंदच्या छातीवर, हातावर, पायावर चाकूने वार केले. जखमी झाल्याने जयहिंद ने आरडाओरडा केला. यावेळी तबेल्याचे मालक व इतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. 

चोरट्यांना पकडून बांधून ठेवत चांगलाच चोप दिला. त्यानंतर याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोशन वकृष्णा यांना अटक केली. रोशन हा अल्पवयीन असताना त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *