👁 7 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “आविष्कार” चे आयोजन

डीबाटू च्या झोनल स्पर्धा यंदा कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये होणार.

विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान व संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी तर्फे घेतल्या जाणाऱ्या “आविष्कार” या विभागवार टेक्निकल स्पर्धेचे आयोजन श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथे शनिवार  दि. १० डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती देताना आविष्कार चे संयोजक प्रा. आशिष जोशी यांनी सांगितले की या स्पर्धेमध्ये सोलापूर व पुणे झोन मधील अभियांत्रिकी, फार्मसी, अग्रिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट या विभागातील जवळपास ४३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेसाठी सोलापूर, पुणे, रायगड, ठाणे, सांगली, कोल्हापूर, नगर, रत्नागिरी, उस्मानाबाद अश्या विविध जिल्ह्यातून विद्यार्थी येणार आहेत.  यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ लोक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील झोन पैकी सर्वात जास्त नोंदणी या स्पर्धेसाठी झाली असून सुमारे १५० प्रोजेक्ट या स्पर्धे मध्ये सादर केले जाणार आहेत. 

स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांना पंढरपूर बस स्टँड पासून कॉलेज बस ची सोय केली असून लांबून येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची ही सोय कॉलेज तर्फे केली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून प्रा. आशिष जोशी तर सह संयोजक म्हणून प्रा. दीप्ती कुलकर्णी काम पाहत आहेत. महाविद्यालया मधील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *