लग्नसमारंभात लोकांना मनसोक्त नाचताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. लग्नातले डान्सचे व्हिडिओज कायम चर्चेत असतात. खासकरून दिल्ली, महाराष्ट, हरियाणा आणि युपीच्या डान्सचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात.
आजकाल लग्नात किंवा हळदीला सपना चौधरीची बरीच गाणी वाजताना दिसतात. सपना चौधरीचे लाखो फॅन्स आहेत. हरियाणाच्या प्रसिद्ध स्टार्सपैकी एक ती आहे. सोशल मीडियावर तिचे करोडो फॉओअर्स आहेत. आजही तिच्या लाईव्ह परफॉर्मेंन्ससाठी खूप गर्दी होते
सध्या लग्नाच्या फंक्शनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक साडी परिधान केलेली महिला सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं तेरी आंख्य का यो काजल… यावर प्रचंड ऊर्जेसह नाचत आहे. स्त्री तिच्या नृत्यात पूर्णपणे हरवून जाते. व्हिडिओमध्ये तिच्या आजूबाजूला काही वडीलधारी मंडळीही पाहायला मिळतात, पण त्या सर्वांना विसरून ती आपल्याच तालावर नाचत आहे.
व्हायरल व्हिडिओ Shraddha Temre Katre नावाच्या युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला १ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या महिलेच्या डान्सपुढे सपना चौधरीचा डान्ससुद्धा फेलआहे असं काहीजणांचं म्हणणं आहे. डान्समध्ये मग्न असलेल्या या महिलेला कशाचेचं भान नाही ती डान्सचा पुरेपूर आनंद घेताना दिसून येत आहे.



