👁 7 Views

दारू पार्टीसाठी जंगलात नेले अन् केली हत्या, संशयीत गजाआड

 

निमखेडी महादेव मंदिराजवळ प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) याचा खून करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी उमाळा येथील जंगलातून सायंकाळी ताब्यात घेतले.


मृत प्रमोदने बायकोवर भानामती (जादूटोणा) करून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याच्या संशयातून सुनील ऊर्फ साबीर नियामतखाँ तडवीने त्याचा मित्र सत्यराज नितीन गायकवाड याच्या मदतीने खून केल्याची माहिती अटकेतील संशयितांनी दिली 


एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रमोदचे वडील सुरेश शेट्टी यांनी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर सोमवारी सकाळी निमखेडी शिवारात प्रमोदचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, नाना तायडे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, गोविंदा पाटील यांनी थेट सुनील तडवीची सासरवाडी चिंचखेडा (ता. जामनेर) गाठले. 


तेथून उमाळा वनक्षेत्रात संशयित दडून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने उमाळा जंगलात शोध घेतला. तेथे सुनील ऊर्फ साबीर नियामतखाँ तडवी (वय २८), सत्यराज गायकवाड (२६, रा. गणेशनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, दोघांना आधिक तपासासाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *