केवळ 300 रुपयांवरुन झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील बैतूल येथे घडली आहे.
सुमन काकोडिया याने आपला मोठा भाऊ रमेश काकोडिया याच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. याच पैशांवरुन त्याचे रमेशसोबत भांडण झाले. मग या भांडणाचे मारामारीत रुपांतर झाले. यावेळी रमेशने सुमनच्या डोक्यात पाईपने वार केला. यात सुमनचा मृत्यू झाला.
दोघेही भाऊ नशेत होते. नशेत त्यांच्यात पैशावरुन वाद झाला. या वादातून रमेशने सुमनची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला, असे सुमनचा दुसरा भाऊ श्याम सिंह याने सांगितले
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पाढर पोलिसांनी रमेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध सुरु केला आहे.



