👁 12 Views

11 जणांच्या टोळीने केला युवकावर हल्ला

 

जुन्या भांडणाच्या कारणातून सुमारे 11 जणांच्या टोळक्‍याने युवकावर हल्ला करुन जबरी चोरी केली. ही घटना शुक्रवार पेठ व माजगावकर माळ झोपडपट्टी या परिसरात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. साहिल रणदिवे, गजानन जाधव, पोपट भैय्या उर्फ अर्जुन, शुभम दानेश, शिवम निकम व अनोळखी 5 ते 6 जण (संशयित सर्व रा. माजावकर माळ झोपडपट्टी, प्रतापसिंहनगर, गोडोली, सातारा) यांच्याविरुध्द सिद्दिक इम्तियाज बागवान (वय 18, रा. बुधवार पेठ, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कला वाणिज्य कॉलेज पाठीमागे व झोपडपट्टी परिसरात ही घटना दि. 14 रोजी घडली.


जुन्या वादाच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार युवकाला जबरदस्तीने दुचाकीवरुन नेऊन पट्ट्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. 


तसेच कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करुन दुखापत केली. तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *