👁 4 Views

दुर्दैवी: स्कुटरची गुरांना धडक, वीस वर्षीय युवकाचा मृत्यु

 

गोव्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. यात विशेषत: दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. धारबांदोडा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात वीस वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.


मुलाच्या दुचाकीने गुरांना दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रामलाल प्रकाश साळुंके (वय 20, रा. धारबांदोडा) असे या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. खांडेपार येथील जुन्या पुलाजवळ गुरांना धडक बसल्याने त्याच्या स्कूटरचा अपघात झाला. 


रमालाल कामावरून घरी जात असताना शुक्रवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, रात्रीच्या रस्त्यात येणाऱ्या तसेच विश्रांती घेणाऱ्या भटक्या गुरांची समस्या अधिक गंभीर होत आहे. यामध्ये होणाऱ्या अपघाताची संख्या देखील वाढत असल्याचे या मार्गावरून जाणारे प्रवासी सांगतात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *