👁 12 Views

दुचाकी चोरट्यांकडून 4 दुचाकी व एक रिक्षा जप्त

आतिश मोहन नातू (वय 23 रा.शनिनगर, पुणे), आकाश प्रकाश जाधव (वय 24 रा.कात्रज),शिवराज भिमाशंकर कोळी (वय 23 रा. हिंजवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत असताना तपासी पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे यांना खबर मिळाली 


की, अमत खान व त्याचे वरील तीन अटक साथीदार हे लिपाणे वस्ती येथे असून त्यांनी परिसरात दुचाकी चोरल्या आहेत. यावरून पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली आहे.


या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या 4 दुचाकी व चोरीला गेलेली रिक्षा असा एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस तपासात आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पाच गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *