👁 14 Views

झाडावर आदळून दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू

 

 झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा भागात घडली.बिरसिंग ब्रीजकिशोर कुशवाह (वय ३५, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.


दुचाकीस्वार बिरसिंग भरधाव वेगाने रात्री मुंढवा भागातून निघाला होता.


इलेविआ सोसायटीसमोर एका झाडावर दुचाकीस्वार कुशवाह आदळला. 


या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुशवाह याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *