👁 9 Views

कै.पै.दत्ता तारापूरकर यांच्या कुटूंबाची बापूसाहेब भुजबळांनी घेतली भेट माजी मंत्री छगनराव भुजबळांनी सात्वंन करत केली मदत

पंढरपूर-

समता परिषदेचे माजी शहराध्यक्ष कै पै दत्ता तारापूरकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ साहेब यांनी पंढरपुरात येवून भेट घेत त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व एका मुलीस तिचे शिक्षण पूर्ण झाले नंतर नोकरी संदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे वतीने शब्द देण्यात आला, व यावेळी भुजबळ साहेब यांनी अधिवेशन असताना 


सुद्धा फोनवरून श्रीमती सोनाली तारापूरकर यांचे सांत्वन करून भुजबळ कुटुंब पूर्णपणे तुमच्या पाठीशी कायम उभे असेल असं आश्वासन दिले यावेळी समता परिषदेचे नूतन जिल्हाध्यक्ष किशोर माळी यांनी तात्काळ 1 लाख रुपये व मुलींचे शैक्षणिक जो खर्च असेल तो उचलेल अशी ग्वाही दिली ,तसेच युवराज पतसंस्थेचे चेअरमन उमेश सासवडकर यांनी पतसंस्थेच्या वतीने 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली 


याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाची भुजबळ परिवाराने तात्काळ दखल घेत सर्व  कार्यक्रम रद्द करून तारापूरकर यांच्या कुटूंबियाच्या भेटीस  जाण्याचे आदेश दिले.


यावेळी समता परिषदेचे दिलीप भुजबळ करमाळा,अनिल अभंगराव पंढरपूर, बापू भंडारे,प्रा ,जयंत भंडारे सर, प्रकाश अधटराव, सोमनाथ अभंगराव, अनंता करकमकर ,माऊली आबा अधटराव,महम्मद उस्ताद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *