👁 9 Views

21.42 लाखांची इलेक्ट्रिक केबल , 1.30 लाखांची दारु चोरी

 

गोव्यात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. 


दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी 21.42 लाखांची इलेक्ट्रिक केबल चोरी केली आहे तर, दुसऱ्या घटनेत चोरट्याने चक्क 1.30 लाखांची दारू चोरी केली आहे.


दक्षिण गोवा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी केपे  परिसरातून 21 लाख 41 हजार 990 रूपयांची इलेक्ट्रिक केबल चोरी केली होती

 केपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मेहताब अली (रा. ओल्ड गोवा) याच्यासह तिघांना अटक केली आहे. 


पोलिसांनी वीज साहित्यही जप्त केले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *