👁 8 Views

शिकारीसाठी झाडावर चढलेला वाघ माकडावर झडप घालणार इतक्यात…..

 

वाघ हा जंगलातील असा प्राणी आहे की ज्याच्या सामर्थ्यासमोर जंगलातील इतर बरेचसे प्राणी कमकुवत वाटतात.


जंगलात वाघ दिसला की प्राणी आपला जीव वाचवून पळ काढतात. शिकार करण्यात वाघ अतिशय तरबेज प्राणी मानला जातो. असे असले तरी वाघ प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असे नाही. कधीकधी त्यालाही निराश व्हावे लागते. कारण काही प्राणी ताकदीने नव्हे तर युक्तीने बाजी पलटवतात. व्हायरल झालेला एक व्हिडिओ हा त्याचाच एक पुरावा आहे, असं नक्की म्हणता येईल.


जंगलातला हा व्हिडीओ खूपच मस्त आहे. असे घडते की यामध्ये वाघ झाडावर चढताना दिसतो. माकड झाडावर अगदी आरामात बसलेले असते. त्याला वाघ जवळ येत असल्याची कसलीही भीती नसल्याचे ते माकड दाखवते. पण वाघ जसा जवळ येतो तसे ते माकड आपला प्लॅन आमलात आणते आणि वाघाशी झुंजही न करता वाघाला जमिनीवर पाडते.


वाघ माकडाच्या जवळ पोहोचताच झाड हालत असते. वाघाच्या वजनाने झाडावर कोणीतरी येत आहे असे समजू शकते. वाघ जसाजसा पुढे येतो तसे पाहणाऱ्यांचीही धडधड वाढते. वाघ माकडावर झडप घालणार इतक्यात माकड लगेच एका झाडावरून दुसऱ्या फांदीवर निघून जाते. वजनदार वाघाचा मात्र तोल जातो. वाघ तिथेच झुडपात लटकत राहतो आणि स्वत:च्याच वजनाने खाली पडतो. अवघ्या २ मिनिटे १२ सेकंदाच्या या व्हिडीओने चांगलीच वाहवा मिळवली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *