👁 8 Views

रेल्वे मार्गावर भीषण अपघात; 2 जणाचा मृत्यु, 7 जखमी

 

पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर ब्लास्टिंगमुळे दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश आहे.


जखमींना कर्जत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम चालू असताना मोठे दगड रस्त्यावर आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.


वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे मार्गाच काम चालू असताना अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम चालू आहे. यावेळी झालेल्या ब्लस्टिंगमुळे मोठे दगड रस्त्यावर आल्यानं हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


या अपघातानंतर स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्थानिकांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा सवाल नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *