👁 10 Views

सोलापूर: कर्तव्य सोडुन पोलिसांचा भरचौकात डान्स

 

सोलापूर शहरातील चौकात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने भरचौकात मनसोक्त डान्स  केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.


राजेश पवार असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात  कार्यरत आहेत. सोलापरातील रहदारी असणाऱ्या गंगामाई हॉस्पिटल समोरील रस्त्यावर पवार यांनी डान्स केला.


रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसमोर पोलीस कर्मचारी डान्स करत असल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलिसाचा डान्स करतानाचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. शहराची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे तेच जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पहायचे असा प्रश्न सध्या सोलापूरकरांना पडला आहे.


दरम्यान, या घटनेबाबत नागरिकांनी सोलापूर शहर पोलीस दलाला  माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सदर बाझार पोलीस ठाण्याचे  पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
पोलीस उपनिरीक्षक डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर डान्स करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल राजेश पवार यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *