कुर्डुवाडी (प्रतिनिधी) : वर्धापन दिनानिमित्त गरजू व्यक्तींना पोशाख,आणि दिवाळी फराळाचे वाटप नांदिकेश्वर समाज सेवा मंडळ, म्हेसगाव, ता. माढा, जि. सोलापूर या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते वामनभाऊ उबाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. रमेश भिसे (लेखा परीक्षक कुर्डुवाडी) उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष अर्जुन लोंढे यांनी केली. यावेळी बालाजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गावातील निराधार, गरीब, दिव्यांग व गरजू व्यक्तींना पूर्ण पोशाख (ड्रेस) वाटप करण्यात आले. तसेच दिवाळीनिमित्त दादासाहेब जगताप व राजाभाऊ सातव यांच्या वतीने गरजूंना नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सतीश गोडसे व माजी सरपंच पंडित खारे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून संचालक मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात संस्थेची अशीच भरभराट होऊन समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक व्हावेत,अशा शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवक नेते अप्पासाहेब उबाळे यांनी केले.
या कार्यक्रमास सतीश गोडसे, सरपंच मुकुंद उबाळे, माजी सरपंच पंडित खारे, दत्तू पाटील, सचिन पाटील, अतुल पाटील, सौदागर जगताप, विलासकाका जगताप, विनोद जगताप, कमालभाऊ शेख, शिवाजी कोकरे, तुकाराम जगताप, लखन चांदणे, धनुसिंग रजपूत, इंजि.पांडुरंग सरवदे, विलास गायकरवाड, बालाजी मदने, महादेव सरवदे, विजय उबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

