👁 5 Views

पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच मानाचा तुरा


नागेश साळुंखे क्रिकेट ॲकॅडमी पंढरपूर येथील क्रिकेट अकादमी मध्ये शिकणारी कु.मयुरी शंकर थोरात (रा.सोनके) येथील छोट्याशा ग्रामीण भागांमधून महाराष्ट्राच्या मुलींच्या पंधरा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.


पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासामध्ये आजपर्यंत कोणत्याही मुलीने किंवा मुलाने महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान पटकावलेले नाही पंढरपूरच्या क्रिकेट इतिहासात मयुरी थोरात हिने खऱ्या अर्थाने मानाचा तुरा खोवलेला आहे.


तिच्या या अथक परिश्रम नागेश साळुंखे क्रिकेट अकादमीचे श्री नागेश साळुंखे सर यांनी तिला केलेले सततचे मार्गदर्शन अहोरात्र घेतलेले वर्षानुवर्षाचे प्रयत्न हे खऱ्या अर्थाने आज फळ स्वरूपाला आलेले आहेत असे म्हटले तर वावगं ठरणार नाही तिच्या पुढच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी पंढरपुरातून सर्वत्र तिचं कौतुक केलं जात आहे 


मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद या शहरांचा वर्चस्व असणाऱ्या क्रिकेट अकादमी ग्रुपमध्ये पंढरपूरच्या ग्रामीण भागामधील विद्यार्थिनींना चांगले दर्जेदार क्रीडा शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून सतत प्रयत्न करणारे श्री नागेश साळुंखे सर यांच्या अकरा वर्षाच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असे यावेळी म्हणता येईल..

हरियाणा येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उद्या दिनांक 30 डिसेंबर रोजी रांची ला रवाना होणार तिच्या पुढील वाटचालीसाठी एन एस क्रिकेट ॲकॅडमी व सर्व पंढरपूरकरांसाठी कडून खूप खूप शुभेच्छा💐💐💐

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *