👁 8 Views

बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला , काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला

 

सरते वर्ष २०२२ ला बायबाय करून आता नवे संकल्प घेऊन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झालीय. गतवर्षी सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील.


काही माणसं विनाशकाले विपरीत बुद्धीनुसार वागल्याने प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात किंवा सर्पदंशाने त्यांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या. या धक्कादायक घटनांमधूनही काही माणसांनी धडा घेतलेला नसेल. कारण एका व्यक्तीचा अजगरासोबत जीवघेणा खेळ करण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. अजगराला खेळणं समजून त्याच्यासोबत खेळणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडलीय. त्यामुळे सापांसोबत खेळण्याचा संकप्ल कुणी केला असेल, तर आताच सावध होण्याची गरज आहे. कारण हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


हा थरारक व्हिडीओ worldofsnakess या इन्स्टाग्रावर पेजवर शेअर करण्यात आला आहे. “व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिलंय, इतर प्राण्यांप्रमाणे या अजगरालाही एकटं राहायचंय. घरी अशा सापांसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना फक्त एकटं राहून जंगलात फिरायचं आहे.” क्रिंग कोब्रा, इंडियन कोब्रा, घोणस अशा विषारी सापांना पकडायला जाणंही काही जणांच्या जीवावर बेतलं आहे.


 सापाला पकडून व्हिडीओ काढून सोशल मीडियावर हिरोगीरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वन विभागाकडून सापांना न पकडण्याचे आणि त्यांच्या जवळपास फिरू नये, अशा सूचना लोकांना नेहमीच दिल्या जातात. पण काही माणसं नियमांचं उल्लंघन करून सापाला पकडण्याचं धाडस करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती घरी आणलेल्या सापासोबत कशाप्रकारे खेळ करत आहे. पण सापाला पकडल्यानंतर काही सेकंदातच साप त्याच्या अंगावर धावून येतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. साप दंश करण्याच्या प्रयत्नात असताना तो व्यक्ती स्वत:ला कसाबसा सावरतो आणि सापाच्या हल्लापासून तो वाचतो. पण या विशाल अजगराने या व्यक्तीला त्याच्यासोबत बिनकामाची मस्ती केल्यावर काय घडतं? याचं जीवंत उदाहरण दिलं आहे. सापानेही त्याचा रंग दाखवून त्या माणसाला धडा शिकवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *