सिंहगड – सुट्टे पैसे न दिल्याच्या रागातून खानापूर (ता.
चेतन संभाजी जावळकर यांचे खानापूर येथे गोकुळ सुपर मार्केट या नावाने किराणा मालाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी एक आरोपी पाचशे रुपये सुट्टे मागण्यासाठी आला असता चेतन जावळकर त्याला सुट्टे पैसे नाहीत असे म्हणाले होते.
तेव्हा आरोपी तुला दाखवतो म्हणून निघून गेला. दि. 3 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रितेश भोसले व इतर पाच ते सहा जण हातात कोयते, रॉड, दारुच्या बाटल्या घेऊन जावळकर यांच्या दुकानासमोर गेले.
आरोपींनी किराणा दुकानातील कामगार सुराराम चौधरी याला धमकावत दुकानातील काचा व शटरची तोडफोड केली. चेतन जावळकर यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खानापूर येथे दाखल झाले होते. यातील मुख्य आरोपी रितेश भोसले याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.



