👁 6 Views

Pandharpur Live News : महर्षी वाल्मिकी संघाच्या मागणीनंतर पुरातत्व खात्याचे अधिकारी पंढरीत! मागणीनुसार सर्व कामे सुरु असल्याची अधिकार्‍यांची ग्वाही-गणेश अंकुशराव


पंढरपुर (प्रतिनिधी) : पंढरपुरमध्ये सध्या सुरु असलेल्या मंदिर श्रीविठ्ठल मंदिर (vitthal mandir) जतन व संवर्धनाचे काम पहाण्यासाठी पुरातत्व खात्याचे अधिकारी पंढरीत आहेत, त्यांच्या देखरेखीखाली आता हे काम सुरु असुन काम सुरु असताना आढळुन आलेल्या कांंही पुरातन ऐतिहासिक वस्तु व शिलालेखांचा अभ्यास पुरातत्व खात्याकडुन सुरु आहे. याबबतची मागणी पंढरपुरातील सामाजिक संघटना महर्षी वाल्मिकी संघाकडून करण्यात आली होती. 

पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी भागात कांही दगडी रांजणसदृश्य वस्तु आणि मंदिरातील सर्वच फरशीखाली अनेक शिलालेख आढळुन आले यानंतर पंढरपुरातील सामाजिक संघटना महर्षी वाल्मिकी संघाकडून सदर पाडकाम व खोदकाम हे पुरातत्व अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करावे तसेच पुरातत्व खात्याने  आढळुन आलेल्या रांजणसदृश्य वस्तुसह शिलालेखांचा अभ्यास करुन या सर्व शिलालेखांवर कोणत्या लिपीत आणि काय लिहिलेले आहे याचा अभ्यास करुन पुरातत्व खात्याने शोध लावण्याची मागणी केली होती. यानंतर श्रीविठ्ठल मंदिरात पुरातत्व खात्याचे अधिकारी आले असुन येथील आढळुन आलेल्या सर्व ऐतिहासिक वस्तुंची व शिलालेखांची पाहणी केली आहे. 

श्रीविठ्ठल मंदिर सुरु असलेल्या सर्व कामाचे निरीक्षण पुरातत्व खात्याने बारकाईने करावे, येथे कांही देवतांच्या मुर्तीखाली महादेवाच्या पिंडी सदृश्य आकारमान सुध्दा आढळुन येत असुन यासंदर्भातही अभ्यास करावा तसेच या अभ्यासाअंती माहित नसलेला इतिहास उजेडात येतोय का? याचा शोध लावुन पंढरीची पुरातन महती जगासमोर मांडावी. अशी मागणी यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असुन यासह विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी पुरातत्व खात्याचे अधिकारी डॉ. विलास वाहणे व मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना दिले. यावेळी पुरातत्व खात्याची सर्व टीम उपस्थित होती. 

आपल्या मागणीनुसार पंढरपुरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराला फार मोठा पुरातन इतिहास आहे, मंदिरात मागील काळात नवीन बांधकाम झाले असताना अनेक पुरातन वस्तु, आणि ऐतिहासिक खाणाखुणा जमिनीत गाडल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, आज मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या निमित्ताने कांही ऐतिहासिक खाणाखुणा व वस्तु दृष्टीस पडल्या असुन याचा पुरातत्व खात्याकडून सखोल अभ्यास करु, येथे सुरु असलेली सध्याची सर्व कामे ही कॅमेर्‍यासमोर सुरु असुन आपल्या मागण्यांचा योग्य विचार करु अशी ग्वाही पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी यावेळी दिली असल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे. निवेदन देताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, माऊली कोळी, प्रकाश मगर, अश्‍विन बुरले, समाधान कोळी, भैया गाडे, बबलु आसबे, अप्पा करकमकर, यश अंकुशराव, वाल्मिकी अंकुशराव आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *