लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. त्यामध्ये अनेकदा डान्स केलेले व्हिडीओ असतात.
‘लो चली मैं अपनी देवर की बारात लेके…’ या गाण्यावर वहिनीने दीराच्या लग्नात जोरात ठुमके लगावले आहेत. त्यावेळी नवरा लग्नाची कपडे घालून घोड्यावर बसला आहे. वहिनी दिराच्या लग्नात जोरात डान्स करीत आहे. आजूबाजूचे लोकं वहिनीचा डान्स पाहून बावरले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून लोकांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिल्याचं सांगितलं आहे. काही लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडल्याचं सुध्दा सांगितलं आहे.
theviralvichar या युजरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. साडे तीन हजार लोकांनी त्यावर कमेंट केली आहे. त्याचबरोबर काही जणांनी नाचत असलेल्या महिलेला सल्ला देखील दिला आहे.



