Pandharpu : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

Pandharpu : विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी) : जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे . विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली .

25 मार्चपासून ही नोंदणी सुरू होणार आहे . पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ग्रीष्मातील वाढत्या उन्हापासून विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत दररोज चंदन उटी पूजेची परंपरा आहे .या परंपरेसह 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी होणाऱ्या नित्य पूजा, तुळशी, अर्चना पूजा ,पाद्य पूजा पाहण्यासाठीभाविकांना घरबसल्या या पुजांसाठी नोंदणी करता येणार आहे .

पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून भाविक येतात .यामध्ये कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांना मागील वर्षी याच कालावधीत ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली होती .या नोंदणी प्रक्रियेला

भाविकांनी चांगला प्रतिसादही दिला होता .याबाबत मंदिर समितीच्या तीन मार्च रोजी झालेल्या बैठकीत संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येईल . ‘

ऑनलाईन नोंदणीसाठी कुठे संपर्क कराल ?

आता, तिसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्यपूजा व चंदनउटी पूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा.

कसे असतील पूजांचे दर ?

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.21,000/-, रू.9,000/- इतके देणगी मुल्य आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजलेपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *