कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलानं आईच्या प्रियकराला संपवलं ……..

कोयत्यानं सपासप वार करून अल्पवयीन मुलानं आईच्या प्रियकराला संपवलं ……..

Loading

सांगली: अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करत ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. दत्ता शरणाप्पा सुतार (वय-३०, शिवशंभो चौक, मूळ रा.-इंदिरानगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

घटना शहरालगत असलेल्या कदमवाडी रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दत्ता सुतार हा सेंट्रींग कामगार आहे. तो यापुर्वी इंदिरानगर परिसरात राहण्यास होता. गेल्या काही दिवसांपासून शिवशंभो चौकातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुतार हा त्या महिलेच्या घरीच राहण्यास होता. त्याच्यासोबत त्या महिलेचा अल्पवयीन मुलगाही रहात होता. दत्ता सुतार त्या महिलेसोबत किरकोळ कारणातून वाद घालत मारहाणही करत होता. हे संशयित मुलगा नेहमी पहायचा त्यातून त्याचा राग उफाळत गेला. यापुर्वी देखील भांडण झाले होते. दत्ताचा काटा काढण्याचा कट यापुर्वीही रचण्यात आला होता. परंतू संशयितांने बुधवार (दि.१९) त्याला निर्जनस्थळी गाठत खून केला.

बुधवार (दि.१९) सकाळी मृत दत्ता आणि त्याचा मित्र अतुल ठोंबरे हे कामासाठी घरातून बाहेर पडले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्या महिलेच्या मुलाने मृत सुतार याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याला पैसे देण्यासाठी मृत सुतार व त्याचा मित्र ठोंबरे हे दोघे दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) वरून सांगलीवाडीतून कदमवाडी रस्त्यावर गेले. दरम्यान, त्याचवेळी संशयित मुलगा आणि त्याचे दोन साथीदार त्याठिकाणी होते. अनैतिक संबंधाचा राग पुर्वीपासूनच त्या मुलाच्या मनात होता. त्याच रागातून त्याने काटा काढण्याचा कट रचला.

दत्ता दुचाकीवरून त्याठिकाणी आल्यानंतर क्षणात संशयित मुलाने त्याच्या छातीवर दगड मारला. त्यामुळे दत्ता रस्त्यावर पडला. त्यानंतर या मुलाने हातातील कोयत्याने सपासप वार केले. वार इतके वर्मी होते की दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर त्याचा मित्र ठोंबरे हा तेथून पळून गेला. या हल्ल्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने दत्ताचा जागी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्र फिरवत एक तासाच्या आत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *