👁 6 Views

प्रेमाच्या जाळ्यात अडकून बदनामीची धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मागण्याचा प्रकार

 

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे ओळख झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून शारीरीक संबंध  प्रस्थापित केले. त्यानंतर तिने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली.


बदनामी करण्याची व आत्महत्या करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी  मागण्याचा प्रकार समोर आला आहे. 


याप्रकरणी येरवडा येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. १६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कळंबोली येथील एका ३० वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२१पासून सुरु होता. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची स्टार मेकर या ऑनलाईन अ‍ॅपद्वारे
ओळख झाली. त्यानंतर तिने फिर्यादींना प्रेमाच्या जाळ्यात पाडले.
त्याच्या कल्याणीनगर येथील घरी तिचे येणे जाणे सुरु झाले.
त्यातून त्याचे सोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले.


त्यानंतर त्याची फसवणूक करुन फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांचा मानसिक छळ केला. फिर्यादी यांचे ऑफिसमधील लोकांकडे व नातेवाईकांकडे बदनामी करेल, तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करुन तुला व तुझ्या घरच्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकेन, मी आत्महत्या करेल, अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. फिर्यादी यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *