सोलापूर ते अक्कलकोट हायवे रोडवर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) टोलनाक्याजवळ एसटी बस (क्रमांक एम.एच. 13 सी.यु. 7903) निष्काळजीपणे चालवून कुंभारी टोलनाका येथे टोल देण्यासाठी उभे असलेल्या वाहनाला धडक दिली.
ही घटना 16 फेब्रुवारीला घडली. याप्रकरणी प्रवासी सुनंदा बसवराज होनमुर्गी (वय 42 रा. हन्नूर, ता. अक्कलकोट) यांनी वळसंग पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून एसटी चालक हनुमंत भानुदास नागरगोजे (व्यवसाय – एसटी चालक, देवगड आगार, जि. सिंधुदुर्ग, रा. लिंबाखाना, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. 16) संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील बस हयगईने चालवून कुंभारी टोल नाका येथे टोल देण्यासाठी उभे असलेल्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातामध्ये बसमधील प्रवासी, धडक दिलेल्या वाहनाचे चालक हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. धडक दिलेल्या वाहनाचे नुकसान करण्यास चालक जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.