👁 9 Views

वाढदिवशीच तरुणावर काळाचा घाला ! सेल्फी काढण्याच्या नादात बुडून मृत्यू

 

काळीज पिळवटून टाकणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. वाढदिवसानिमित्ती फिरायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील चास येथील घोडनदीवर ही दुर्देवी घटना घडली आहे.


सेल्फी काढण्याचा नादात ही घटना घडल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

साईप्रसाद वेन्नपूसा बालमलकोंडा असं मृत तरुणाचं नाव आहे. साईप्रसाद मुळचा आंध्र प्रदेशातील होता, मात्र शिक्षणानिमित्त तो पुण्यातील नारायणगाव येथे राहत होता.


मिळालेल्या माहितीनुसार, साईप्रसाद वाढदिवस असल्याने कॉलेजला न जाता मित्रांसोबत चास येथे फिरायला गेला होता. तेथे घोडनदीत असलेल्या रांजण खळग्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. येथे सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला


साईप्रसाद जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रा.प.सबनीस महाविद्यालयात कॉमर्स शाखेत बारावीत शिकत होता. वाढदिवसानिमित्त फिरायला गेलेल्या साईप्रसादवर काळाने घाला घातला. रांजण खळगे खूप खोल असल्याने घोडेगाव पोलीस आणि नागरिकांनी बराच शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *