👁 7 Views

बापरे! जमिनीत सापडला 20 फुटांचा महाकाय अजगर

 

जंगलातील दुनियेत कधी कुणाची शिकार होईल, हे सांगता येणार नाही. सोशल मीडियावर नेहमीच रानावनात भटकणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसतात.


एखादा प्राणी दुसऱ्यांची शिकार करतो, तर कधी दुसऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यात स्वत:च शिकार होतो. अनेकदा वन्यप्राणी जंगलात भटकताना दिसतात. तसंच सरपटणारे सापही त्यांची शिकार शोधायला जंगल सफारी करताना दिसतात. 


एका जगंलात अशाच प्रकारचा विशाल अजगर जमिन खोदताना आढळून आला. बुलडोझर जमिनीचं खोदकाम करत असताना २० फुटांचा भलामोठ्या अजगराने विळखा घालून समोर दिसल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. 

अजगराचा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण माणूस समजून अजगराने बुलडोझरवर हल्ला चढवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.


अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओत एक महाकाय अजगर बुलडोझरवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडीओत दिसणारा महाकाय अजगर भला मोठा असल्याने त्याला पकडताना माणसांच्याही नाकी नऊ आले असते, असंच म्हणता येईल. जंगलात २० फूट लांबीचा आणि जवळपास १०० किलो वजनाचा हा अजगर बुलडोझरवर दंश करताना दिसतोय. या जंगलात हा अजगर फिरत असल्याचं स्थानिक नागरिकांनी पाहिलं होतं. त्यानंतर या अजगराला बुलडोझरच्या साहय्याने बाहेर काढण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *