👁 11 Views

लोकल ट्रेनमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या

 

मुंबईची लोकल ट्रेन हा मुंबईकरांचा जीव्हाळ्याचा विषय आहे. मुंबईची लोकल तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.


असाच एक लोकल ट्रेनमधला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला एकमेकांच्या अंगावर चढत असून एकमेकांचे केस ओढत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.


सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लोकल ट्रेनमधील हा डब्बा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. या ट्रेनमध्ये महिला दोन प्रवाश्यांमध्ये वाद होतो. वाद इतका विकोपाला जातो की त्या दोन महिला एकमेकांसोबत हाणामारी करायला सुरवात करतात.

या भांडणात आणखी एक महिला उडी घेते आणि हाणामारी आवाक्याबाहेर जाते. तेव्हा इतर महिला ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करतात.


व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. @__Saffron_Fire_ या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *