👁 7 Views

दोन मुलांच्या बापाचे चार मुलांच्या आईशी प्रेमसंबंध, प्रेमासाठी केली आत्महत्या

 

राजस्थानमध्ये एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. दोन मुलांचा बाप आणि चार मुलांच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या बाडमेर येथे घडली आहे.

बाडमेर जिल्ह्यातील आवटी गावातील ही घटना आहे. गावातील माधाराम याचे चार मुलांच्या आई असलेल्या मगीसोबत अवैध संबध होते. त्याबाबत माधारामच्या पत्नीला कळले होते. त्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता.


 माधाराम यांचा मुलगा अनोपाराम याला दोन मुलं आहेत. त्याचे अवैध संबध असल्याने त्याची पत्नी आणि त्याच्यात सतत वाद व्हायचे. त्यामुळे बायको कंटाळून मुलांना घेऊन माहेरी गेली. दोन दिवसांपूर्वी दोघंही अचानक गायब झाले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बायको मगी बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. आता माधाराम आणि मगी दोघांचे मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले.


माधाराम आणि मगी यांची एका लग्नात ओळख झाली होती. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्यामुळे दोघांच्या कुटुंबात दरदिवशी भांडणे व्हायची. मगीच्या घरात त्यावरुन जोरदार भांडण झाल्याने ती घर सोडून माधारामच्या घरी आली होती.


 जिथे माधारामच्या घरात एकाच फाशीत दोघांनी आत्महत्या केली. माधाराम आणि मगीचा काहीच पत्ता लागत नव्हता. दोघं एकत्र पळाल्याच्या अफवा होत्या, अशात माधारामच्या कुटुंबियांनी त्यांना सगळीकडे शोधले. पण जेव्हा माधारामच्या घरी सगळे पोहोचले दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर आसपासच्या लोकांना आणि पोलिसांना त्याची माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *