👁 9 Views

भांडी धुण्यास नकार , शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

 

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत भन्नाट डान्स केल्याचे असतात. 


तर कधी आपल्या आवडत्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी एखादं सरप्राइज दिल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत मात्र, सध्या गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही.


कारण एका महिला शिक्षेकेने विद्यार्थिनीने भांडी घासली नाहीत म्हणून तिला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेने आपल्या विद्यार्थिनीला खरकटी भांडी धुण्यासाठी बळजबरी केली. 


मात्र विद्यार्थिनीने भांडी धुण्यास नकार दिल्यामुळे शिक्षिकेला राग आणि रागाच्या भरात तिने विद्यार्थिनीला मारहाण केली.

 या घटनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या शिक्षिकेवर कठोक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर शिक्षण विभागाने पौरी जिल्ह्यातील देवला पौखल या भागातील ही घटना असल्याचं सांगितलं आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *