👁 9 Views

ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करायची तयारी ठेवा-अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव ,पंढरपूर सिंहगड मध्ये कार्निव्हल २ के २३ चे शानदार उद्घाटन

पंढरपूर: प्रमोद बनसोडे 

आई वडीलांचा,  गुरुजनांचा आशिर्वाद घेऊन ध्येय रेषा गाठण्यसाठी कष्ट घेणे आवश्यक आहे. आपण भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. देशाचे नाव सुजलाम सुफलाम करण्यसाठी आपण  प्रयत्नशील बना. सिंहगड संस्था हि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात देशाच्या विकासाचे संशोधन होऊन उत्कृष्ट इंजिनिअर घडतील. विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे असे मत सोलापूर अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.


   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील कार्निव्हल २ के २३ वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त घेण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सोलापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, प्रा. सोमनाथ नवले, पंढरपूर पोलीस स्टेशनचे धनंजय जाधव, रोटरी क्लब पंढरपूरचे सचिव सचिन भिंगे, रो. किशोर निकते, रो. किशोर सोमाणी, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. 


   कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी कार्निव्हल २ के २३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवल २के२३ चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, डाॅ. संपत देशमुख, डॉ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. भालचंद्र गोडबोले, डाॅ. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम, प्रा. शिवाजी पवार, प्रा. सुमीत इंगोले, प्रा. यशवंत पवार, आदींच्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  कोराना कालावधीनंतर प्रथमच सिंहगड कॉलेज मध्ये महाविद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फूड स्टाॅल, फनी गेम्स, ढोल पथक, वेषभूषा, व्यक्तीमत्व स्पर्धा, शेलापागोटे, संगीत खुर्ची, ग्रुप डान्स, वैयक्तिक गायन, वैयक्तिक डान्स वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी कला-कौशल्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 


    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुञसंचालनाची धुरा सांभाळली. कार्निव्हल २ के २३ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी वृदं यांनी शिस्तप्रिय अतिशय मेहनत घेतल्यामुळे खुप सुंदर असे परफॉर्मन्स सादर करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांच्या या परफॉर्मन्सचे उपस्थितांकडून भरपूर कौतुक झाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *