👁 10 Views

बंद पडलेल्या कंपनीत भयानक कांड ,20 वर्षीय तरुणाचे आधी सापडले शीर, मग

 

औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये मागच्या 24 तासांत दुसरी खुनाची घटना समोर आली आहे. 


काल फरशी डोक्यात घालून खून केल्याची माहिती समोर आली होती ही घटना ताजी असताना आता वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगावात शीर धडावेगळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


ही घटना बंद पडलेल्या कंपनी परिसरातील असल्याने कोण नसल्याचा अंदाज घेऊन हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्यापही सविस्तर माहिती समोर आली नाही.

औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये एकाचा खून करून शीर धडावेगळे करण्यात आले आहे. दरम्यान त्या शिरावर माती टाकून मुजवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. 


आज (दि. 15) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान मृताच्या हातावर छत्रपती लिहिलेले असल्याची माहिती दिसून आली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेने वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ माजली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *