👁 5 Views

मांजा ने घेतला दुचाकी चालकाचा बळी

 

नायलॉनच्या मांजावर महाराष्ट्रात बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर पतंग उडवताना केला जात आहे.


अशाच एका पतंगाच्या नायलॉन मांजाने भिवंडी शहरातील कल्याण नाका येथील स्व.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून दुचाकी वरून जाणाऱ्या व्यक्तीचा बळी घेतला आहे.

संजय कबीर हजारे वय ४७ रा. उल्हासनगर ३ असे बळी गेलेल्या निष्पाप व्यक्तीचे नाव आहे. 


ही घटना उड्डाणपुलावर नवीबस्ती परिसरात घडली असून शहर पोलीस ठाण्यात या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *