सिगारेट पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 14 जानेवारीला रात्री साडेनउच्या सुमारास रामटेकडी परिसरातील आदिनाथ सोसायटीनजीक घडली आहे.
याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित सिद्धार्थ शिवशरण (वय 27 रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश रवींद्र जाधव (वय 20, रा. रामटेकडी ) आणि आयुश काळे (वय 22, रा. कोंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिद्धार्थ शिवशरण (वय 60) यांनी तक्रार दिली आहे.
त्यावेळी घरानजीक थांबलेल्या हल्लेखोर मंगेश आणि आयुशने रोहितकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. मात्र, रोहितने त्यांना पैसे दिले नाही. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने रोहितच्या डोक्यात, कमरेवर आणि पाठीवर वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संदीप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक राहूल गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.



