👁 7 Views

धक्कादायक! घरात एकट्या असलेल्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार ….

 

मथुऱ्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मथुरा जिल्ह्यातील हायवे ठाणे क्षेत्रात ९ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


२ अल्पवयीन मुलांनी घृणास्पद कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांनी अत्याचाराचा व्हिडिओ देखील बनवला आहे. आरोपींनी घृणास्पद कृत्य करून पीडितेला धमकी देऊन फरार झाले आहेत. कोणाला सांगितल्यास व्हिडिओ सार्वजनिक करू अशी धमकी आरोपींनी दिली.


या प्रकरणी मथुऱ्यातील हायवे ठाणे क्षेत्र पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पीडितेच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, आम्ही शनिवारी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. ९ वर्षाची मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी शेजारचे दोन अल्पवयीन मुले हे ९ वर्षाच्या मुलीला घरी एकटे पाहून घरात घुसले.


तक्रारीनुसार, मुलीने या दोघांना विरोध केला. या आरोपींनी मुलीचा अत्याचाराचा व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर आरोपींनी मुलीला व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *