👁 6 Views

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस उलटली, एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

 

मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले.


तर २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.


भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती दरम्यान फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती

 तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक दीपक धोत्रे यांनी जखमींवर उपचार केले एकजण मयत झाला असून आठ जणांना पुढील उपचारासाठी इतर दवाखान्यात रेफर करण्यात आहे २९ जण स्टेबल असल्याची माहिती दीपक धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *