👁 9 Views

तरूणाचा जीवघेणा स्टंट ! एका चाकावर बाईक चालवायला गेला अन् घडली जन्माची अद्दल

 

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करतात. धोकादायक स्टंट करणं अनेकांना महागात पडल्याचंही आपण पाहिलं आहे. तरीही जीवघेणे स्टंट करण्याची अनेकांची सवय काही केल्या जात नाही.


शिवाय हे स्टंट करण्यामुळे आपणाला किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं याचे एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एक मुलगा स्टंट करताना भरधाव बाईकवरुन छातीवर पडला आणि रस्त्यावरुन फरपटत गेल्याचं दिसत आहे.


सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. प्रत्येकजण इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करुन दाखवण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करतो. या स्टंट करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बाईकस्वारांचा समावेश असतो. अशाच एका तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडी


ओतील तरुण अतिशय धक्कादायक असा स्टंट करताना दिसत आहे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण इतरांपेक्षा काहीतरी वेगळा स्टंट करण्यासाठी आपल्या बाईकचे पुढचे चाक काढतो आणि केवळ मागच्या चाकावर तो बाईक भरधाव वेगाने पळवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही बाईक चालवताना तो बाईकवर उभा राहून वेगवेगळ्या हावभाव करताना दिसत आहे.


याचवेळी तो अचानक खूप जोरात रस्त्यावर पडतो आणि रसत्यावरुन फरपटत जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी जीवावर बेततील असे स्टंट करण्याता वेडेपणा करु नये असं म्हणत आहेत. तर सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये एवढा धोकादायक स्टंट करण्याची गरज नव्हती असं लिहिलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *