👁 7 Views

कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांची कयू स्पायडर मध्ये निवड


 कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची कयू स्पायडर या प्रशिक्षण देणर्‍या संस्थेमध्ये निवड झाली आहे. कयू स्पायडर ही सॉफ्टवेअर टेस्टिंग संबंधित प्रशिक्षण देणारी जगातील नामांकित संस्था असून त्याद्वारे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. 


विद्यार्थ्यांची निवड करण्यापूर्वी कयू स्पायडर संस्थेतर्फे निवड पूर्व परीक्षा घेण्यात आली होती या मध्ये   कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची निवड संस्थेने केली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातील निमा सरडे व राहुल मेहेत्रे यांची निवड करण्यात आली तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील विशाखा घोडके, अंजली कुणाले, सूरज मस्के यांची तर मेकॅनिकल इंजीनीरिंग विभागातील श्रेयस कुंमठेकर, रोहित देवकर, ऋषिकेश पवार, सायराबानू शेख, महेश पांचाळ  या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 


कर्मयोगीमधील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रशिक्षण अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षा पासून च दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याधीच नोकरी मिळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांची सदरच्या प्रशिक्षासाठी निवड होण्यासाठी प्रा. धनंजय शिवपुजे यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा मोहसिन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *